पावस गावातील ग्रामपंचायत ही सन १९४२ मध्ये स्थापन झाली असून तिचे इमारत नुतनीकरणाचा शुभारंभ दिनांक १०/०८/२०२४ रोजी करण्यात आला. गावामध्ये सर्वसाधारण पायाभूत सुविधा उत्तम प्रकारे विकसित आहेत.
पाणीपुरवठा – गावामध्ये नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जातो, ज्यामुळे प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी उपलब्ध होते.
सार्वजनिक सुविधा – गावात बँका, शाळा, पोस्ट ऑफिस आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अशा आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
स्वच्छता – गावामध्ये लोकसहभाग आणि श्रमदानातून स्वच्छता मोहिमा राबविल्या जातात. यामुळे गाव स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यास मदत होते.
रस्ते आणि रस्त्यावरील दिवे – गावात ठिकठिकाणी रस्त्यांवर पथदिव्यांची सोय करण्यात आली असून, संध्याकाळी संपूर्ण गाव उजळून निघते.
शाळा – पावस गावात जि.प. प्राथमिक शाळा, पूर्ण प्राथमिक शाळा, हायस्कूल आणि कॉलेज अशी शैक्षणिक संस्थांची चांगली व्यवस्था आहे.
अंगणवाडी – गावामध्ये एकूण ७ अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून लहान मुलांच्या संगोपन व शिक्षणाची चांगली सोय आहे.
आरोग्य केंद्रे – प्राथमिक आरोग्य केंद्र, पावस येथे सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा आणि औषध पुरवठा केला जातो. तसेच पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी येथे कार्यरत आहेत.
स्वयं-साहाय्य गट केंद्रे – गावात ३८ स्वयं-साहाय्य गट असून हे सर्व गट सक्रीयपणे कार्यरत आहेत.
बसथांबे / संपर्क सुविधा – पावस एसटी स्टँड हे आजूबाजूच्या गावांसाठी केंद्रस्थानी असून, या भागातील दळणवळण व्यवस्था सुस्थितीत आहे.
आरोग्य शिबिरे – प्राथमिक आरोग्य केंद्र, पावस यांच्या वतीने नियमित आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात.
लसीकरण मोहिमा – मुलांच्या नियमित लसीकरणासाठी विशेष शिबिरे राबवली जातात, ज्यामुळे आरोग्य संरक्षणाचा प्रसार होतो.








